शेतात केक कापून नववर्षाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतात केक कापून नववर्षाचे स्वागत
शेतात केक कापून नववर्षाचे स्वागत

शेतात केक कापून नववर्षाचे स्वागत

sakal_logo
By

ओतूर, ता. १ : ओतूर (ता. जुन्नर) येथील शेत मजूर महिलांनी शेतात केक कापून नवीन वर्षाचे स्वगत केले.
वर्षभर ऊन, वारा की पाऊस असो मजुरी करणाऱ्या महिला आहे त्या परिस्थितीत काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाच्या संसाराचा गाडा चालवितात. यात त्यांना नेहमी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या महिला एकमेकींबरोबर काम करता-करता कुटुंबातील समस्यांबाबत चर्चा करून मनमोकळे केले जाते. छोट्या मोठ्या प्रसंगात आपला आनंद शोधून तो अनुभवण्यासाठी प्रयत्नशील राहताना या महिला सुखी जीवन जगताना दिसतात, सुख दुःखाच्या साक्षीदार असणाऱ्या या शेतमजूर महिलांनी मजुरीला गेलेल्या शेतावरच केक कापून नववर्षाचे स्वागत केलं.
दररोज शेतात काम करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या ओतूर येथील पूजा गोंदके, चंद्रकला गोंदके, जया बटवाल, सविता घोगरे, जया गाढवे, नयना गाढवे, ज्योती गाढवे, निशा गाढवे, सुलाबाई घोगरे, मंदा गाढवे, तनुजा गाढवे, ज्योती आगिवले, मंदा तांबे, उज्वला भालेराव, तनुजा गोडे, मीरा खंडागळे, कविता गोडे, कांचन बांगर, सुकाबाई दुधवडे या महिलांनी एकत्रित येऊन केक कापला.