रोहोकडीत शेतकऱ्यांनी गिरविले टोमॅटो उत्पादनाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहोकडीत शेतकऱ्यांनी गिरविले टोमॅटो उत्पादनाचे धडे
रोहोकडीत शेतकऱ्यांनी गिरविले टोमॅटो उत्पादनाचे धडे

रोहोकडीत शेतकऱ्यांनी गिरविले टोमॅटो उत्पादनाचे धडे

sakal_logo
By

ओतर, ता. १४ : रोहोकडी (ता.जुन्नर) येथे टोमॅटो उत्पादकांसाठी रविवारी (ता. १२) टोमॅटो पीक कार्यशाळा पार पडली. विक्रमी उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकरी अजित घोलप यांच्या स्वतःच्या शेतात एक दिवशीय प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी घोलप यांनी आपल्या शेतात टोमॅटो लागवडीसाठी बेसल डोस, मल्चिंग पेपरची निवड, दोन बेडमधील अंतर, रोपांची लागवड पद्धत, त्यानंतर टोमॅटोची बांधणी, उन्हाळी टोमॅटो उत्पादनासाठी तापमानाचे नियोजनासाठी स्प्रिंकलरचा वापर, जैविक तसेच सेंद्रिय, रासायनिक असे एकात्मिक पद्धतीने टोमॅटोचे उत्पादन कसे घ्यावयाचे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस महाराष्ट्रातून तसेच राजस्थान, कर्नाटक अभ्यासू शेतकरी उपस्थित होते.

टोमॅटो लागवडीसाठी रोपांची योग्य निवड लागवडीनंतर रोपांची घ्यावयाची काळजी यासंबंधी माहिती देण्यासाठी विश्व हायटेक नर्सरीचे वीरेंद्र थोरात हे उपस्थित होते. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये पीजीआरचा योग्य वापर कसा करावा, याबाबत गोपीनाथ दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. जैविक खते व औषधे याबाबत डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी प्रशिक्षित केले. टोमॅटोमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व कीड रोग नियोजन यासंदर्भात तुषार उगले यांनी मार्गदर्शन केले. याबरोबर टोमॅटोमधील ट्रेस मॅनेजमेंटबाबत डॉ. हेमांगी जांभेकर यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ''द फार्म'' तसेच ''ही मैत्री विचारांची'' या शेतकरी ग्रुपने परिश्रम घेतले. बाजीराव गागरे यांनी सूत्रसंचालन केले.

03767