शरदचंद्र पवार कॉलेजच्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरदचंद्र पवार कॉलेजच्या 
नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड
शरदचंद्र पवार कॉलेजच्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड

शरदचंद्र पवार कॉलेजच्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

ओतूर, ता. ३ ः ओतूर (ता. जुन्नर) श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डुंबरवाडी येथे टॅप अॅकॅडमी बंगळूरू तर्फे महाविद्यालयातील ३८ विद्यार्थ्यांची ऑनलाइन ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या २१ विद्यार्थ्यांची कंपनीच्या कॅम्पस रिलेशन मॅनेजर सैदा अफशा जीनाद यांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन मुलाखती घेतल्या. अंतिम फेरीत १० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. या मुलाखतीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यू. खरात आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. सचिन जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे यांनी अभिनंदन केले.