ओतूरला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूरला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी
ओतूरला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

ओतूरला बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

sakal_logo
By

ओतूर, ता. ९ : ओतूर (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. ९) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्‍ल्यात मेंढपाळ किरकोळ जखमी झाला. बबन बाळू डुबे (वय ३२, मूळ रा. साकूर, ता. संगमनेर, जि. नगर, सध्या रा. ओतूर), असे जखमी त्याचे नाव असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
ओतूर येथील पानसरेपट या ठिकाणी अंबादास झेंडे यांच्या मालकी शेतात मेंढ्यांचा वाडा रात्री मुक्कमी होता. तेथेच मेंढपाळ डुबे हाही झोपला होते. त्याच्या जवळ असलेल्या कुऱ्यावर बिबट्याने झेप मारली. त्यावेळी बिबट्याचा पंजा बबन याच्या डोक्याला लागला व तो किरकोळ जखमी झाला. आवाज झाल्याने बिबट्याने येथून धूम ठोकली. जखमी बबन यास ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचार व लस देण्यासाठी डॉ. मीनू मेहता मेमोरिअल हॉस्पिटल नारायणगाव येथे दाखल केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एम. गीते, वनरक्षक पी. के. खोकले, फुलचंद खंडागळे व साहेबराव पारधी यांच्या पथकाने पाहणी करून जखमी मेंढपाळास नारायणगाव येथे उपचारासाठी नेले.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात मेंढपाळ महिलेवर रात्री झोपलेली असताना बिबट्याने हल्ला करून किरकोळ जखमी केले होते. त्यात परत बिबट्याचा हल्ला झाल्याने मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण आहे.

नागरिकांनी घराबाहेर झोपणे टाळावे, शक्य नसल्यास उंच जागेवर झोपावे. मेंढपाळांनी मेंढ्याच्या मुक्कामाच्या शेतात झोपताना उंच जागेवर झोपावे. पाळीव प्राण्यासोबत झोपू नये. आजूबाजूच्या परिसरात झाडेझुडपे व लपण नसावे. सर्वत्र प्रकाश असावा. बिबटबाबत कोणतीही घटना घडल्यास वनविभागाशी संपर्क करावा.
- वैभव काकड, वनपरिक्षेत्र अधिकार, ओतूर (ता. जुन्नर)