Wed, June 7, 2023

महात्मा फुले संस्थेच्या अध्यक्षपदी संजीव शिंदे
महात्मा फुले संस्थेच्या अध्यक्षपदी संजीव शिंदे
Published on : 27 March 2023, 9:01 am
ओतूर, ता. २७ : उदापूर (ता. जुन्नर) येथील महात्मा फुले ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजीव लक्ष्मण शिंदे तर उपाध्यक्षपदी मनोहर धोंडिभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अनिता विजयकुमार येंधे यांनी काम पाहिले.
यावेळी मंगेश शिंदे, पांडुरंग बेळे, ओंकार शिंदे, वसंत शिंदे, नामदेव अमूप, संजय भास्कर, मनिषा शिंदे, आशा बुगदे, प्रवीण शिंदे हे यांची संचालकपदी निवड झाली आहे. तर व्यवस्थापक मुकुंद रामचंद्र शिंदे, लेखनिक विशाल म्हसणे व अंकिता नारुडकर हे आहेत.