जुन्नरचा आमदार आयात उमेदवार नसेल

जुन्नरचा आमदार आयात उमेदवार नसेल

Published on

ओतूर, ता.११ : ‘‘जुन्नर तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचाच असेल आणि तो आयात उमेदवार नसेल,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.
ओतूर (ता.जुन्नर) येथे बुधवारी (ता.१०) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आय काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका आणि महाविकास

आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आयोजित जाहीर नागरी सत्काराला उत्तर देताना कोल्हे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की महाविकास आघाडीत प्रत्येक नेत्यांना आमदार व्हावेसे वाटत आहे. यात काही गैर नाही कारण तुम्ही सर्वानी तुमच्या कर्तृत्वाने ५१ हजार मताचे मताधिक्य लोकसभेला भलेभले सोबत नसताना मिळवून दिले आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा मी मनापासून आदर करतो. विधानसभेचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे.

कोल्हे पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र भर प्रचार करण्यासाठी जात असताना जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जुन्नर तालुक्याला एक न्याय व महाराष्ट्र इतरत्र एक न्याय असे करता येणार नाही. काहींना घरवापसीचे डोहाळे लागले असतील. या सगळ्याच्या वेळी एकदा फक्त साहेबांचा विचार करा एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. जर तालुक्यात मी एखाद्यासाठी पक्षाचे दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचे आहे की, तालुक्यात का दार उघडले? त्यामुळे कोणत्याही मोठ्या नेत्याचे दार वाजवताना या गोष्टीचा विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे.


यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, विघ्नहर अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, अनंतराव चौगुले, माऊली खंडागळे, शरद लेंडे, अंकुश आमले, तुषार थोरात, मोहित ढमाले, बाबा परदेशी, दिलीप कोल्हे, गणपत डुंबरे, शरद चौधरी, वल्लभ शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी तांबे, दिलीप गुजाळ, वैभव तांबे, सुनील मेहेर, अनिल मेहेर, सुरेखा वेठेकर, नीलम तांबे, कावा गागरे, बाजीराव ढोले हे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मला वाटले नव्हते येथे सर्व सामान्य लोकांचे एवढे प्रश्न प्रलंबित असतील आणि एवढी गर्दी होईल कारण येथे प्रत्येक रविवारी काहीतरी भरत असल्याचे मी एकले होते. तसेच तेथील मंत्रिमहोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधी कडे यावे लागते.
- अमोल कोल्हे, खासदार

05897

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.