जलजीवनच्या कामाबाबत ठेकेदाराची मनमानी

जलजीवनच्या कामाबाबत ठेकेदाराची मनमानी

Published on

उद्धट, ता. ११ ः पवारवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचे काम ठेकेदार याच्या मनमानी कारभाराने चालू आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत खरात यांनी बुधवारपासून (ता. १०) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पवारवाडी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसताना किंवा जागा दिली नसतानाही ठेकेदार याने स्वतःच्या मनाने उदमाईवाडीतील मुख्य जागेवर अतिक्रमण करून काम सुरू केले आहे. ग्रामपंचायत हद्दीत उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तीन टाक्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, तावशी योजनेतील टाकी बांधण्यासाठी जागा दिली नाही. मात्र, तरीही ठेकेदार आपल्या मनमानी व वर्क ऑर्डरप्रमाणे काम करत नसल्यामुळे हे उपोषणास करण्यात येत आहे.
या योजनेवरून परिसरातील १० ते १२ गावे व वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलजीवन मिशन योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने तीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधण्याची परवानगी दिली होती. येथे तीन टाक्यांचे काम पूर्ण केले आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या चौथ्या टाकीचे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी खरात यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत खरात यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता, वालचंदनगर पोलिस ठाणे, ग्रामपंचायत पवारवाडी यांना निवेदन दिले आहे.

जलजीवन योजना ही १२ गावांची जीवन वाहिनी असून, या कामामध्ये ठेकेदाराने त्याच्या मनाने जागा घेऊन त्यावर तीन टाक्या बांधल्या असून, त्या देखील बेकायदेशीर आहेत. त्याची जागा दुसऱ्या ठिकाणी असून, गावामधील मोक्याची जागा यासाठी बेकायदेशीररीत्या बळकावली आहे. जलजीवनच्या अधिकाऱ्यांना याविषयी काही घेणे देणे नाही. सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे व टाक्या प्रस्तावित ठिकाणी तयार केल्या पाहिजेत.
- यशवंत खरात, सामाजिक कार्यकर्ते

00421, 00422

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com