सणसर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
उद्धट, ता. ८ : सणसर (ता. इंदापूर) येथे माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी माहिती अधिकार कार्यशाळेचेही आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार डूणगे, सरपंच यशवंत नरुटे, माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष विकास क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, सुनील निंबाळकर, राहुल पाटील, राहुल जगताप, नीलेश भाग्यवंत, किरण गायकवाड यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष विकास क्षत्रिय यांनी माहिती अधिकार कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले, तर पोलिस निरीक्षक डूणगे यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व सांगितले. यानंतर प्रमुख व्याख्याते यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडू गव्हाणे आदींनी माहिती अधिकारी कायद्याबाबत मार्गदर्शन केले.