कारखेल सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश भापकर

कारखेल सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश भापकर

Published on

उंडवडी, ता. १ : कारखेल (ता. बारामती) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश माणिकराव भापकर तर उपाध्यक्षपदी शहाजी धोंडीबा क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली.

पूर्वीचे अध्यक्ष अंकुश भोसले व उपाध्यक्ष निवृत्ती सखाराम खराडे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया घेतली. यामध्ये अध्यक्षपदासाठी प्रकाश भापकर व उपाध्यक्ष पदासाठी शहाजी क्षीरसागर यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे भापकर यांची अध्यक्षपदी तर क्षीरसागर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित केली.
अमर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याकामी संस्थेचे सचिव महादेव वावगे यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व संचालक मंडळासह सुरेश वनकुद्रे, विजय चव्हाण, शमशुद्दीन तांबोळी, विकास भापकर, नानासो भोसले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.