कारखेल- अंजनगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण

कारखेल- अंजनगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण

Published on

उंडवडी, ता. १२ : कारखेल हद्दीतील शिंदेवस्ती ते सोनवडी सुपे मार्गे अंजनगाव (ता. बारामती) हा सुमारे नऊ किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून तयार झालेला हा मार्ग निकृष्ट कामामुळे अल्पावधीतच उखडला आहे.
दररोज शेतमाल, उसासह इतर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर- ट्रकसह विद्यार्थी व प्रवासी या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. संत तुकाराम पालखी महामार्गावरील टोल टाळण्यासाठी अनेक अवजड वाहनचालक या मार्गानेच प्रवास करत असल्याने वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीची वाहतूक म्हणजे जणू मृत्यूच्या खाईत जाणे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी तक्रारी दिल्या. तरीही प्रत्यक्ष दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतील कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्त्यावरील दुरवस्थेमुळे शेतमाल बाजारात वेळेत पोहचत नाहीत. उसाची व भाजीपाल्याची वाहतूक उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास येत्या आठवड्यात रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

02962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com