

उंडवडी, ता. २८ : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत असलेल्या धान्याच्या गोदामाला भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ही घटना सोमवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे गोदाम प्रमोद जालिंदर मोरे यांचे आहे. त्यामध्ये पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसेच मका (दाणे) मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवला होता. आगीमुळे सर्व माल खाक झाला आहे.
माहिती मिळताच बारामती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
याबाबत गोदामाचे मालक प्रमोद मोरे यांनी सांगितले की, आग रात्रीच्या सुमारास लागली असावी. काही प्रमाणात माल शिल्लक असला तरी नेमके नुकसान किती झाले आहे हे सध्या सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गोदामात एकूण सुमारे सहा कोटी रुपयांचा माल होता.
03230
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.