टिळेकरवाडी ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिळेकरवाडी ग्रामपंचायतीतर्फे
विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम
टिळेकरवाडी ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम

टिळेकरवाडी ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ५ : टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २० महिलांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सन्मान २०२३’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुभाष लोणकर, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, श्री दत्तसेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, कल्पना जगताप, अस्मिता पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा कांचन, मीनाक्षी म्हेत्रे, प्रियांका चौधरी, अश्विनी कोतवाल, कविता कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.

मेघना झुझम यांनी ‘मी तुमची सावित्रीबाई फुले’ या एकपात्री नाटकामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास सादर केला. जि. प. शाळा येथील मुलांच्या वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायत सदस्य गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, कल्पना टिळेकर, वैशाली चौरे, प्रियांका कांबळे, ग्रामसेवक स्वाती राजगुरू आदींनी सहकार्य केले. ग्रामपंचायत सदस्या सुषमा टिळेकर यांनी आभार मानले.