रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी आंदोलनाचा इशारा

रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी आंदोलनाचा इशारा

उरुळी कांचन, ता. ८ : उरुळी कांचन, थेऊर, नायगाव (ता. हवेली) येथील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामासंदर्भात उरुळी कांचन येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजय भोसले यांना निवेदन दिले आहे. यावेळी डांबरीकरणाचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांना दिला होता.

मागील चार महिन्यांपासून उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव कांचन कॉलेज ते बायफ संस्थेच्या गेट पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण कामासंदर्भात उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत.

कार्यकारी अभियंता अजय भोसले म्हणाले कि, थेऊर - नायगाव - उरुळी कांचन रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर कंपनीला प्रतिदिन ५ हजार रुपये विलंब भरपाई आकारणीचा प्रस्ताव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केला आहे. नुकसान भरपाईच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय आल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम सुरु करण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे.
दरम्यान, थेऊर - नायगाव - उरुळी कांचन या रस्त्याची २०१८ साली पूर्ण टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. हे काम मोतीलाल धूत इन्फास्ट्रक्चर प्रा. लि या कंपनीला मिळाले होते. कंपनीने या रस्त्याचे काम सन २०१९ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, सदर ठेकेदाराने काम संथगतीने सुरू केले. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

निवेदन देताना उरुळी कांचन शहर भाजप शहराध्यक्ष अमित कांचन, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पूजा सणस, हवेली तालुका झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गणेश घाडगे, मानसी भुजबळ आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com