स्वास्थ्यम सूर्यनमस्कार उपक्रमाला डॉ. अस्मिता विद्यालयात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वास्थ्यम सूर्यनमस्कार उपक्रमाला
डॉ. अस्मिता विद्यालयात प्रतिसाद
स्वास्थ्यम सूर्यनमस्कार उपक्रमाला डॉ. अस्मिता विद्यालयात प्रतिसाद

स्वास्थ्यम सूर्यनमस्कार उपक्रमाला डॉ. अस्मिता विद्यालयात प्रतिसाद

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १२ : सकाळ माध्यम समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ''सकाळ स्वास्थ्यम’ प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन सोमवार (ता. १३) पासून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळ माध्यम समूह आयोजित ‘स्वास्थ्यम सूर्यनमस्कार’ उपक्रमात मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ४५० विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

‘सकाळ’च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नमंजूषा स्पर्धेचे कुपन देऊन स्पर्धेची माहिती देण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी सकाळ स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी जगताप म्हणाल्या की, सकाळ वृत्तपत्राने ‘सकाळ स्वास्थ्यम’ हे एक वाचनीय खुले व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याने मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.

यावेळी नेहा तांबे, रेश्मा खैरे, माधुरी जगताप, श्वेता लोळे, स्नेहल कोतवाल, कांचन चव्हाण आदी शिक्षक वर्ग, कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------------------