उरुळीत स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे सुरू करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळीत स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे सुरू करावे
उरुळीत स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे सुरू करावे

उरुळीत स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे सुरू करावे

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १ : लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचनसह परिसरातील १० गावांसाठी दोन वर्षापूर्वी स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली. मात्र, पोलिस संख्याबळाअभावी उरुळीत स्वतंत्र पोलिस ठाणे अद्याप सुरू न झाल्याने या पोलिस ठाण्यास कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत व ते तातडीने सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व युवा नेते अजिंक्य कांचन यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे केली आहे.

स्वतंत्र पोलिस ठाण्याचा कारभार सुरू होण्यास दिरंगाई झाल्याने भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व युवा नेते अजिंक्य कांचन यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची सोमवारी (ता. २७) भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी बोलताना गोयल म्हणाले, उरुळी कांचन पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी आमचेही सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलिस स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.

निवेदन देताना युवा नेते अजिंक्य कांचन म्हणाले, ग्रामीण पोलिस ठाणे उदयास आल्यास सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बळ मिळणार आहे. वाहतूक कोंडी व गुन्हेगारी कमी होणार याबाबत कोणातेही दुमत नाही. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्यावर कामाचा ताण वाढल्याने, उरुळी कांचन येथे पोलीस ठाण्याचे विभाजन व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.

शंभर पदे भरली जाणार
उरुळी कांचन स्वतंत्र पोलिस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, या पोलिस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून यामध्ये १ पोलिस निरिक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलिस उपनिरीक्षक, २० पोलिस हवालदार, २५ पोलिस नाईक, तर ३० पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत, असे पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले.