Tue, March 21, 2023

टिळेकरवाडी येथे पारंपरिक पद्धतीने होळी
टिळेकरवाडी येथे पारंपरिक पद्धतीने होळी
Published on : 7 March 2023, 3:10 am
उरुळी कांचन, ता. ७ : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे परंपरेप्रमाणे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे शेतकी अधिकारी सदाशिव टिळेकर यांच्या हस्ते होळी पूजन करून होळी पेटविण्यात आली. महिलांनी होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.
यावेळी सदाशिव टिळेकर म्हणाले, ‘‘वाईट संगत, वाईट विचार, व्यसन या होळीमध्ये जळून जाऊन सर्वांना चांगले आरोग्य लाभो.’’
यावेळी यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, लक्ष्मण टिळेकर, सरपंच सुभाष लोणकर, देवस्थानचे अध्यक्ष संतोष टिळेकर, पोलिस पाटील विजय टिळेकर, आबासाहेब टिळेकर, रोहिदास टिळेकर, कालिदास झगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.