उरुळी येथे तरुणाचा अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळी येथे तरुणाचा
अपघातात मृत्यू
उरुळी येथे तरुणाचा अपघातात मृत्यू

उरुळी येथे तरुणाचा अपघातात मृत्यू

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. २ : येथील इनामदार वस्ती परिसरात मंगळवारी (ता. २४) अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गौतम विश्वनाथ गायकवाड (वय २६, रा. उत्तर सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम हा महामार्गाच्या खालील रस्त्याने पायी चालत होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.