Sat, June 10, 2023

भवरापूर येथील
हातभट्टीवर छापा
भवरापूर येथील हातभट्टीवर छापा
Published on : 24 March 2023, 1:39 am
उरुळी कांचन, ता. २४ : भवरापूर (ता. हवेली) येथील टिळेकर वस्तीजवळ आलेल्या ओढ्यालगत जंगलामध्ये सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली. अरविंद रामलाल राजपूत (वय ५४, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी अंदाजे दोन हजार लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य, असे अंदाजे २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला.