आळंदी म्हातोबा येथे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान

आळंदी म्हातोबा येथे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान

उरुळी कांचन, ता. ३ : आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथे पीक स्पर्धा विजेते तसेच शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी तसेच कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत लाभ देण्यात आलेले विविध लाभार्थी यांचा सन्मान करण्यात आला. कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती हवेली व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक दिनकरराव शंकरराव जवळकर ग्रामपंचायत सभागृह येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमात शेतकरी अरुण घुले, अप्पासाहेब काळभोर, बाळासाहेब चौरे, लालासाहेब जवळकर, मोहन भोंडवे, विजय कुंजीर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी औषध फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत अनुदानावर देण्यात आलेल्या विविध अवजारांचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी आयोजित केले होते.

यावेळी शिरूर हवेली आमदार अशोक पवार, माजी सभापती अनिल टिळेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, अप्पासाहेब काळभोर, भूषण जोशी, मारुती साळे, सुनीता जवळकर, अरविंद शिवरकर, मनीषा भोंडवे, दयानंद शिवरकर, श्रीहरी काळभोर, प्रकाश जवळकर, तुषार जवळकर, मुकुंद भोंडवे, दिनकर जवळकर, नाना कामठे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी कृषी विभागाकडील डीबीटी विषयक योजना तसेच फळबाग लागवड, शेततळे, प्रक्रिया प्रकल्प याबाबत विविध योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलग यांनी सूत्रसंचालन तर विस्तार अधिकारी अब्दुल रझाक मुल्ला यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com