बस चालकाला धमकावणाऱ्यांना अटक

बस चालकाला धमकावणाऱ्यांना अटक

उरुळी कांचन, ता. १३ : चालत्या शिवशाही बसचा पाठलाग करून बस थांबवून बस चालकाला धमकावून मोबाईल फोन जबरीने चोरी करून फरारी झालेल्या गुन्हेगारांना अवघ्या काही तासांतच लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी पकडले. उपेंद्र दुधनाथ पासवान (वय २५, रा. सध्या भीम नगर-शिंदे वस्ती, हडपसर, पुणे; मूळ रा. मजाक कंपनीजवळ, शिक्रापूर), भागवत रमेश अंबुरे (वय २२, रा. सध्या भीमनगर, शिंदे वस्ती; पुणे मूळ रा. खानापूर, ता. पातूर, जि. अकोला), आबासाहेब कैलास पन्हाड (वय ३३, सध्या रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, पुणे; मूळ रा. केंदूर, ता. शिरूर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागर गोरखनाथ कदम (वय ३५, रा. तुळजापूर सिडको, जि. धाराशिव) हे सोलापूर आगारातील शिवशाही बसने (क्र. एम.एच. ०६ बी. डब्ल्यू. ११३२) गुरुवारी (ता. १२) दुपारी पावणे दोनच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने जाताना कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर अंगूर वाईनच्या समोर असताना बजाज पल्सर दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ आर.जी. ८९५२) दोन अनोळखी घसरून पडले. त्यामुळे ते व हिरो कंपनीच्या मोइस्ट्रो मोटार सायकलवरील (क्र. एम.एच. १२ एम.एन. ९३३६) दोन साथीदार, अशा एकूण चार अनोळखींनी बसमध्ये येऊन कदम यांना शिवीगाळ करून, ‘आम्हाला कट मारतो काय? तुझी गाडी फोडून टाकीन?’ असे म्हणून कदम यांना गाडी चालविण्यात अडथळा करून हाताने तोंडावर मारहाण करून त्यांच्याकडील रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी करून फरारी झाले.
दरम्यान, गुरुवारी (ता. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी कवडी पाट टोल नाका येथे थांबलेले असल्याची माहिती खबऱ्यामार्फत लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिस पोचले असता आरोपींनी पळ काढला. मात्र, मोठ्या शिताफीने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी झालेला मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली वाहने व आरोपींचे मोबाईल फोन, असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com