पूर्व हवेलीत शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान पार

पूर्व हवेलीत शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान पार

उरुळी कांचन, ता. १३ : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊर, शिंदवणे आदी गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दोन दिवस सलग पाऊस आणि वातावरणातील गारवा यामुळे दुपारनंतर मतदानाचा टक्का समाधानकारक झाला. दुपारी थोडावेळ शुकशुकाट दिसून आला. यावेळी नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला मात्र सुशिक्षित वर्गातच उदासीनता दिसून आली.

कदमवाकवस्ती येथे नवपरिवर्तन फाउंडेशनच्या वतीने बूथ क्रमांक आणि मतदानाचे ठिकाण जाणून घेण्यासाठी ऑनलाइन वोटर हेल्पलाईनची सुविधा करण्यात आली होती. मतदार व कार्यकर्त्यांना उन्हापासून त्रास होऊ म्हणून ठिकठिकाणी मंडप टाकण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. कदमवाकवस्ती येथे एकूण ४५ टक्के मतदान झाले तर लोणी काळभोर येथे १९ हजार ३८३ मतदारांपैकी १० हजार ९० (५२%) मतदारांनी हक्क बजावला.

उरुळी कांचन येथे बूथच्या परिसरात प्रथमोपचार सेवा देण्यासाठी आशासेविका कार्यरत होत्या. येथे शहरी मतदारांच्या उदासीनतेमुळे एकूण २२ बूथवर अवघे ५० टक्के मतदान झाले. कुंजीरवाडी गावामध्ये मात्र विक्रमी ६० टक्के मतदान झाले. कुंजीरवाडी गावात एकूण ५ बूथ होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंजीरवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर फाटा या दोन मतदान केंद्रावर ५ हजार ९३४ हजार मतदारांपैकी ३हजार ६०२ (६०%) मतदारांनी मतदान केले. कुंजीरवाडी ग्रामपंचायत वतीने निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची राहण्याची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली.

भवरापूर गावात जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर एकूण मतदार ५९८ होते त्यापैकी ४५१ (७५%) मतदान झाले. तर थेऊर शहरात ८ हजार मतदार होते. त्यापैकी ४ हजार ७०० (५८%) मतदान झाले. थेऊर येथील काकडे मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली. थेऊर येथे तीन बूथ होते. शिंदवणे गावात येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ६२ टक्के मतदान झाले. येथेही निवडणूक कर्मचाऱ्यांची उत्तम सोय ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती.

मतदारांची नावे यादीतून गायब
बहुतांश गावात सुमारे दहा ते वीस मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी आल्या. तर काही मतदारांची नावे इतर गावात आल्याचे निदर्शनास आले. काहींची नावे चुकली होती.परिणामी अनेक जण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्याने काही प्रमाणात मतदानाचा टक्का घसरला. एकूणच गावात चांगला टक्का वाढला तो कुणाच्या पथ्यावर पडणार आणि तर शहरी भागात थोडी उदासीनता दिसून आली ती कुणाला मारक ठरणार याची चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com