उच्च दाबाच्या वीजवाहिनीखाली लोखंडी सांगाडा

उच्च दाबाच्या वीजवाहिनीखाली लोखंडी सांगाडा

Published on

उरुळी कांचन, ता. ११ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे महामार्गाशेजारीच महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या तारांखालीच लोखंडी सांगाडा उभारण्यात आला आहे.
शिवाय सांगाड्याच्या दोन्ही बाजूने महावितरणचेच रोहित्र आहेत. त्यामुळे वीजवाहिनी अथवा रोहित्रामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. असा अपघात झाला तर त्याला जबाबदार महावितरण की खासगी मालक? असा सवाल उपस्थित होत आहे.

महावितरणच्या नियमाप्रमाणे एखाद्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या तारांखाली घर, दुकान, इमारत कोणतीही वास्तू बांधण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणे व योग्य त्या उपाय योजना करून घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी थेऊर परिसरात घराच्या छता शेजारून गेलेल्या तारांमुळे दोन अपघात झाले होते. ही बाब महावितरणचे वरिष्ठ यांना माहिती आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर आता कुंजीरवाडी येथे महामार्गाशेजारीच महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांखालीच लोखंडी सांगाडा उभारण्यात येत आहे. या कामाकडे महावितरण प्रशासन जाणून दुर्लक्ष करीत आहेत का? की सांगाडा उभारणारी व्यक्ती बडी आहे? असा अर्थपूर्ण प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

होर्डिगधारकांना कायद्याप्रमाणे वितरण विभागाच्या परवानगीची गरज नसते. महावितरणच्या नियमानुसार उच्च दाबाच्या विद्युत तारा या १.१ मीटरच्या अंतरावर असणे आवश्यक आहे. हे अंतर नसल्यास तसेच धोकादायक असणाऱ्या कामांवर नोटीस देऊन कारवाई करण्यात येते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येतील.
- प्रवीण महामुलकर, - वरिष्ठ कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, उरुळी कांचन

02184

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.