लोणी काळभोर पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई
उरुळी कांचन, ता. २१ : लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात गेल्या काही दिवसांत जोरदार मोहीम राबवत गावठी हातभट्टी दारू, गांजा विक्री तसेच जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईत पोलिसांनी द्रौपदी राजेंद्र उपाध्ये (वय ३५), कौशल्या कैलास राखपसरे (वय ६०), निशा कृष्णा उपाध्ये (वय ३२), मंगल संतोष भाले, आकाश संतोष भाले (सर्व रा. लोणी काळभोर), अलका भगवान आरसे (वय ५५, कुंजीरवाडी), लता दादा खलसे (वय ४०, कदमवाकवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून १५० लिटर गावठी दारू आणि ११० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
तसेच माळीमळा येथे जुगार खेळणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली. यात शब्बीर हाजीमिया शेख (वय- ३९, इंदिरानगर), मंगेश कुंडलिक गायकवाड (वय २९), मंगेश रमेश खारपडे (वय ३९, माळीमळा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ५,१५५ रुपये रोख व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, लोणी काळभोर पाषाणकर बाग परिसरातील चिकन दुकानामागे मटका जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दीपक रामचंद्र शेलार (वय ५२), सुरेश बाबूराव सावलकर (वय ७७), चैतन्य राजेंद्र सोनवणे (वय ३०), शिवकुमार रामधिरज परदेशी (वय ५५), अण्णा कान्हू चव्हाण (वय ६२), आणि चणप्पा माधप्पा शिवमूर्ती (वय ६५) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ८,८९० रुपये रोख आणि २०० रुपये किमतीचे जुगार साहित्य असा एकूण ९,०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, युनिट सहाचे पोलिस निरीक्षक शाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पो. ह. प्रशांत नरसाळे, राहुल कर्डिले, सूरज कुंभार, सचिन सोनवणे, वनिता यादव, प्रवीण दडस, युनिट सहाचे शेखर बाळासाहेब काटे, रूपाली कदम, निकिता पोळ यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.