सुधारित बातमी खडकवासला विधानसभा मतदार संघ

सुधारित बातमी खडकवासला विधानसभा मतदार संघ

मताधिक्य ठरविणार विजयाचे गणित

खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना, मनसेसह इतर पक्षांची जोड मिळाली, तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान मोदी विरोधी लाट, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती मिळणार आहे. खासदार सुप्रिया सुळेचा १५ वर्षापासूनचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या जोडीला‌ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते सक्षमपणे प्रचारात उतरले होते. त्यास नव्याने आप व वंचित यांची साथ होती. यामुळे, निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. येथील मताधिक्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

- राजेंद्रकृष्ण कापसे, खडकवासला

खडकवासला मतदारसंघात एकूण ५ लाख ३८ हजार ३१ मतदार आहेत. शहरी भागात ४ लाख ८५ हजार, तर ग्रामीण भागात ४३ हजार मतदान आहे. ग्रामीण भागात शेतकरी, मजूर, कामगार वर्ग आहे. येथे ६० ते ६५ टक्के मतदान झाले आहे. मोदी सरकारवर शेतकऱ्यांची असलेली नाराजी आहे. यामुळे ग्रामीणमध्ये खासदार सुळे यांना मताधिक्य मिळेल. ‘येथे किमान अडीच ते तीन हजाराचे मताधिक्य असेल’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांनी केला. तर, ग्रामीण भागात आमदार भीमराव तापकीर यांनी मागील दोन वर्षात अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधीतून काही कामे मी आणली आहेत. ग्रामीणमध्ये आम्ही मताधिक्य घेऊ, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी केला.
भाजपचे वरिष्ठ नेते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पातळीवर देखील मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ‘घड्याळा’स मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घड्याळाचा प्रचार जोमाने केला. सुळे यांचे ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह पोचवण्यासाठी मोठे कष्ट घेतलेले‌ दिसून आले. सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी मोठी होती. ती सक्षमपणे प्रचारात होती.
खडकवासला मतदारसंघात प्रामुख्याने वारजे, वडगाव, धायरी, शिवणे, धनकवडी, नऱ्हे, बावधन- भुसारी कॉलनी, खडकवासला, नांदेड किरकटवाडी खेडशिवापूर या गावांचा समावेश होतो. शहरीकरण असल्यामुळे येथील मतदार आतापर्यंत ७०-८० टक्के भाजपकडे झुकलेला असतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांना तो कल कायम ठेवण्यात यश आले. खडकवासला मतदार संघात २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान आम्हाला झाले आहे. आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मताधिक्य असणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष काका चव्हाण व माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची येथे स्वतंत्र ताकद आहे. त्यांनी मोठ्या संख्येने हजार सुळे यांच्या प्रचारात उतरून शिवसेनेच्या मतदार यांसह अन्य मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सर्व यंत्रणा शेवटपर्यंत कार्यरत होती असे मतदार संघ प्रमुख नितीन वाघ यांनी सांगितले. येथे काँग्रेसची ताकद आहे. ती आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी होती. या निवडणुकीत ताकद अधिक जोमाने सुळे यांच्या सोबत होती, असे हवेलीचे अध्यक्ष सचिन बराटे यांनी सांगितले.
धनकवडी हे एक मुख्य गाव आहे. या ठिकाणी आमदार भीमराव तापकीर, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी दत्तात्रेय धनकवडे, अप्पा रेणुसे या सर्वांनी मिळून मोठी ताकद या ठिकाणी उभी केली होती. या परिसरातून १५ हजारांचे मताधिक्य असेल.
सिंहगड रस्ता परिसरात आठ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. त्यांनी केलेल्या कामाच्या मार्फत, तसेच आमदार भीमराव तापकीर आणि अजित पवार गटाच्या वतीने या ठिकाणी केलेल्या कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मत देखील मिळेल, असा दावा भाजपचे धनकवडी सिंहगड रस्त्याचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी केला आहे
वारजे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले होते. यातील तीन नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मताधिक्य आमच्याकडे जास्त असेल झालेल्या मतदानापैकी ७० टक्के घेऊ, असा दावा मतदार संघाचे अध्यक्ष आणि बाबा धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी केला. बावधन, भुसारी कॉलनी परिसरात शहरी मतदार आहे. तसेच, या भागातून महापालिकेवर चार नगरसेवक हे भाजपचे विजयी झाले होते. त्यामुळे या परिसरात भाजपचे आता आहे तसे मताधिक्य राहील, असे भाजपचे अध्यक्ष
गणेश वरपे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com