उत्रौलीत शिक्षक सक्षमीकरण 
स्पर्धा उत्साहात

उत्रौलीत शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात

Published on

उत्रौली, ता. ४ : उत्रौली (ता. भोर) येथील जिल्हा परिषद शाळेत तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात पार पडल्या. भोर विकास गटात जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती भोर अंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या दर शुक्रवार, शनिवारी स्पर्धा घेण्यात आल्या.
शिक्षकांना एकविसाव्या शतकातील आव्हाने स्वीकारण्यास सक्षम बनविणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. भोरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, एच. बी. शेख, गट समन्वयक प्रभावती कोठावळे, विषय तज्ञ तानाजी तारू आदींनी स्पर्धेचे नियोजन केले.

स्पर्धेचा निकाल - स्पर्धेचे नाव, विजेता (गावाचे नाव) :
शैक्षणिक साहित्य निर्मिती - आशा जाधव (धावडी), विविध क्लब सादरीकरण - महेंद्र सावंत (देगाव), बाल मानसशास्त्र केस स्टडी- सरिता पाटसकर (खडकी), एमएस पीपीटी - अश्विनी गुरव (वेळू), स्वरचित काव्य सादरीकरण - संगीता वाघराळकर(खानापूर), लोकनृत्य - जस्मिन पठाण (वेळू), रांगोळी - नम्रता कोठावळे (नांद वरचे), वक्तृत्व - महेंद्र शिंदे (खोपी), संगीत वाद्य वादन - सुदेव नलावडे (शिवरे), कथाकथन - सखाराम वाघराळकर (वडतुंबी), नाट्य व मूक अभिनय - सारिका रासकर (करंजगाव), योगासन - (२५ वर्षे ते ४५ वर्षे) पुरुष - सतीश सांगळे (झुलता पूल नाझरे), महिला - प्रिया पवार (आडाचीवाडी), ४६ वर्षे ते ५८ वर्षे महिला - माधुरी बांदल (कामथडी), समूह गायन - लक्ष्मण उफाळे (माळेवाडी), पोस्टर बनविणे - अनुपमा खरे (वर्वे बुद्रूक), फोटोग्राफी - सोमनाथ रेपाळ (नांगरेवाडी), प्रवास वर्णन लेखन - दीपाली शेडगे (बुवासाहेब वाडी), शोधनिबंध - शैला कोठावळे (किवत), कथालेखन - सारिका किरवे (नसरापूर), पुस्तक परीक्षण - स्वाती महांगरे (करंजे), मानसिक क्षमता - नरेंद्र मानकर (घोरपडे वाडी), परकीय भाषा - (जर्मन) गणेश बोरसे (म्हाळवडी), फ्रेंच - सुवर्णा कापरे (ससेवाडी), सुलेखन - संदीप दानवले (कासुर्डी खेबा), आशय ज्ञान - रत्नमाला थोपटे (गोकवडी), शब्द‌कोडे - दिलीप चिकणे (झुलता पूल नाझरे), समज पूर्वक वाचन - मनीषा काळाणे (मादगुडेवाडी), बोर्ड परीक्षा - दत्तात्रेय सगट (महुडे बुद्रूक), मराठी ऑलिंपियाड - संदेश तायडे (आळंदे), गणित ऑलिंपियाड - संतोष तोकटे (जुननजाई), इंग्रजी ऑलिंपियाड - सचिन सोनवणे (पोळवाडी), बुद्धिमत्ता - सुधाकर गिरे (नसरापूर), विज्ञान ऑलिंपियाड - गजानन वाघमारे (धनगर वस्ती), सामाजिक शास्त्र - राजेंद्र झारखंडे (कोळवडी), शैक्षणिक व्हिडिओ - सविता तनपुरे (धोंडेवाडी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com