मांढरदेव घाटात संरक्षक जाळ्या

मांढरदेव घाटात संरक्षक जाळ्या

Published on

उत्रौली, ता. १८ : पावसाळ्यात मांढरदेव घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतात. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेकदा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो. तसेच मांढरदेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर घाटातील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. पुण्याहून भोरमार्गे वाई, महाबळेश्वरला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते आहे.
भोर, कापूरव्होळ ते वाई या ५० किलोमीटर मार्गाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. डोंगराच्या उतारावरील माती आणि दगड खाली कोसळू नयेत तसेच पावसाळ्यातील भूस्खलन रोखण्यासाठी डोंगराच्या धोकादायक उतार तसेच दरडप्रवण क्षेत्रात डोंगराचा कापलेला किंवा सैलसर भाग स्वच्छ करून मोठे दगड काढून उतारावर मजबूत डबल ट्विस्ट मेष असलेल्या लोखंडी जाळ्यावर मजबूत स्टील रोप बसविण्यात येत आहेत. यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार असून संभाव्य जीवितहानी व वित्तहानी टाळता येणे शक्य होणार आहे. मांढरदेव घाटात संरक्षक जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्यात सैल झालेले दगड आणि माती या जाळीत अडकणार असल्याने दरडी कोसळण्याचा धोका कमी होऊन वाहनचालकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित होणार असल्याचे भोर बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.

0061

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com