पुणे
उत्रौलीत शेतातील विद्युत केबलची चोरी
उत्रौली, ता. २७ : उत्रौली (ता. भोर) येथील शेतकरी भरत लेकावळे यांच्या शेतातील विद्युत मोटारीची केबल चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी (ता. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. उत्रौली पंचक्रोशीत केबल चोरीचे प्रकार वारंवार घडत असून याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे. तसेच, नवीन केबल जोडण्यासाठी विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढण्यासाठीही त्यांना मनुष्यबळावर खर्च करावा लागतो. विद्युत मोटार बंद असल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे लांबणीवर पडत आहे. वेळ, श्रम, पैसा यांच्या अपव्ययामुळे येथील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

