प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

Published on

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भोर तालुक्यात विकास करण्यात आला आहे. जनतेचा विकासाकरण्याकरिता निवडणूक लढवली जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होणारच आहेत.
- शंकर मांडेकर, आमदार

भोर तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेली अनेक वर्षे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत असलेली विजयाची परंपरा अव्याहतपणे चालू राहणार आहे.
- संतोष घोरपडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नगरपालिका, महानगरपालिकांत मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विजयाची परंपरा सुरू ठेवणार आहे. भोर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकावला जाणार असून विक्रमी मतांनी चारही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकणार आहे.
- रवींद्र कंक, भाजप, अध्यक्ष भोर तालुका दक्षिण विभाग

काँग्रेसची पक्षाची ताकद चांगली असून जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाई आहे. या निवडणुकीत परिवर्तन निश्चित होणार आहे.
- सतीश चव्हाण, अध्यक्ष, भोर तालुका काँग्रेस पक्ष

भोर तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारी दिली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जात असून जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील.
- अमोल पांगारे, तालुका प्रमुख शिवसेना

महिला सबलीकरणाकरिता तसेच ग्रामीण भागातील पाणंद रस्ते, गिरणी कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीत उमेदवार उभे केले आहेत. जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे. विजयी होईल यात शंकांच नाही.
- भरत साळुंके भोर तालुका प्रमुख उबाठा पश्चिम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com