महाराष्ट्र केसरीकडून हरियाना केसरी चितपट
वरवंड, ता.७ : पाटस (ता.दौंड) येथील ग्रामदैवत नागेश्वर मंदिराचा दोन दिवसीय यात्रा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या जल्लोषात पार पडला. कुस्ती आखाड्यात १ लाख ५१ हजारांची अंतिम कुस्ती लक्षवेधी ठरली. कोल्हापूर येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने हरियाना केसरी वीरेंद्र भिवानी यास चितपट करीत विजेपदावर नाव कोरले.
पाटस गावात महादेवाचे श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या यात्रा उत्सवास सुरुवात होते. यंदा बुधवार (ता.५) व गुरुवार (ता.६) दोन दिवसीय यात्रा उत्सव पार पडला. लोकवर्गणीतून यात्रेचे उत्तम नियोजन नियोजन करण्यात आले होते. मंदिरावर रंगरंगोटी व आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली होते. चौकात गगनचुंबी पाळणे, खेळणी, मिठाई आदी वेगवेगळ्या दुकानांनी बाजारपेठ सजली होती. बुधवारी यात्रेच्या मुख्य दिवशी रात्री बारानंतर देवाचा अभिषेक घालण्यास सुरुवात झाली. दिवसभर मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांच्या दर्शनासाठी रांगा सुरू होत्या. हरहर महादेवाच्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रात्री देवाची पालखी-छबिना काढण्यात आला. यावेळी तरुणांसह अगदी ज्येष्ठाही ठेका धरीत थिरकण्याचा आनंद घेतला. मंदिर परिसरात फटाक्यांची जंगी आतषबाजी सादर करण्यात आली. गुरुवारी सकाळी हजेरीचा कार्यक्रम तसेच सायकांळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. कुस्तीची लढत पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यातून छोट्यामोठ्या वयोगटातील मल्लांनी मोठया संख्येने हजेरी लावली.यावेळी तब्बल १५६ कुस्त्यांचे सामने झाले. दुसरी १ लाख २१ हजारांची कुस्ती झाली. यामध्ये पै.रोहीत जवळकर (लोणीकाळभोर) व विक्रम घोरपडे (अकलूज) यांच्यात झाली. यामध्ये विक्रम घोरपडे याने विजयावर नाव कोरले. तिसऱ्या १ लाख रुपयांच्या कुस्तीत समीर शेख (पुणे)ने रोहित शिंगाडे (कात्रज-पुणे) यास पराभूत करीत बाजी मारली. विजेत्या मल्लांचे ग्रामस्थांनी नियोजित बक्षिसासह सन्मान केला. आखाडा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मानाच्या विड्यांचे वाटप करण्यात आले.
0608
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

