टाकवे बुद्रुक-नाणे गट

टाकवे बुद्रुक-नाणे गट

Published on

टाकवे बुद्रुक - नाणे जिल्हा परिषद गट

राष्ट्रवादीत बंडखोरीचा झेंडा?

एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता गेल्या चार निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला टाकवे बुद्रुक-नाणे हा जिल्हा परिषद गट यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव असूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागेसाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे या पक्षातील एखाद्या नाराज इच्छुकाने दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन निवडणूक लढविल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
- ज्ञानेश्वर वाघमारे

व डगाव शहराचे रूपांतर नगरपंचायतीत झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतून वडगावला वगळण्यात आले आहे. यंदा प्रभाग रचनेत तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. टाकवे बुद्रुक-नाणे गटातून (पूर्वीचा टाकवे बुद्रूक-वडेश्वर) मोठ्या लोकसंख्येचे नवलाख उंब्रे व आजूबाजूच्या वाड्या वगळण्यात आल्या असून नाणे मावळातील काही गावे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे आंदर मावळच्या पश्चिम पट्ट्यातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी प्राप्त झाली आहे.

राष्ट्रवादीत सर्वाधिक इच्छुक
हा गट पूर्वपरंपरागत काँग्रेसचा व पंचवीस वर्षांत एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. शेकापचे उमेदवार भरत मोरे यांनी या गटातून अपवादात्मक विजय मिळवला होता. येथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे यंदा हा गट लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. पक्षाचा बालेकिल्ला राहिल्याने राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक सात ते आठ जण इच्छुक आहेत. उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे भाजप, शिवसेना, काँग्रेस व काही आदिवासी संघटनाही ही जागा लढविण्याची शक्यता आहे. मात्र, या पक्षांमध्ये उमेदवारांची वानवा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एखादा नाराज इच्छुक दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांमध्येच या जागेसाठी लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com