वडगाव पोलिसांकडून
दोन महिलांची सुटका

वडगाव पोलिसांकडून दोन महिलांची सुटका

Published on

वडगाव निंबाळकर, ता. १६ : वेश्या व्यवसायाकरिता जबरदस्तीने चारचाकी वाहनातून चालवलेल्या दोन महिलांची वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिसांनी सुटका करून दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.
करंजेपूल (ता. बारामती) येथील बसथांबा परिसरात सोमवारी (ता. १५) पोलिस पेट्रोलिंगदरम्यान लाल रंगाची काळ्या काचा असलेली संशयित गाडी फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करत गाडी थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आढळल्या. कसून चौकशी केली असता दोन पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून अवैधरीत्या वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचे समोर आले. हडपसर येथून लोणंद येथे आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्यानंतर त्या महिलांना नीरा- बारामती मार्गावरून पुढे घेऊन जात असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) प्रीतम अप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा), अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून स्विफ्ट मोटार (क्र. एमएच ११ एमडी ८०५५) जप्त केली. पीडित महिलांपैकी एकीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. ताब्यात घेतलेली आरोपींवर लोणंद पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा सखोल तपास करून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी व्यक्त केली. या दोन्ही आरोपींना बारामती न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडी सुनावली आहे. महिलांना सुधारगृहात ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com