वडगाव- कोऱ्हाळे रस्त्याचे काम रखडले
चिंतामणी क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव निंबाळकर, ता. २२ ः वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याने ये- जा करताना कसरत करावी लागत आहे.
नीरा नदीकाठी कोऱ्हाळे खुर्द गावातील नागरिक, विद्यार्थी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयासाठी नेहमीच वडगाव निंबाळकरकडे ये- जा करतात. या प्रवासाचा त्रास कमी व्हावा यासाठी पाच वर्षांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रशस्त रस्त्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल तीन कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन २३ ऑगस्ट २०२३ रोजी कामाला सुरुवात झाली. मात्र, दोन वर्षांनंतरही काम पूर्ण झालेले नाही.
रस्त्यावरील पुलांच्या कामांबाबतही गंभीर अनियमितता दिसून येत आहे. वडगाव निंबाळकर येथील चारीवरील पुलाचा दर्जा सुमार असल्याने ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर स्लॅब पाडून नव्याने उंच पूल करावा लागला. इतर ठिकाणी मात्र केवळ सिमेंटच्या नळ्या टाकून काम रखडवण्यात आले आहे. पूर्वीचा रस्ताही उखडून ठेवला असून, लोकांना रोज खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नसल्याचा कोऱ्हाळे खुर्द ग्रामस्थांचा आरोप आहे. दोन वर्षांपासून धोकादायक रस्त्याचा सामना करावा लागत असून हा निधी कुठे गेला? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
रस्त्याचे काम एकसारखे होत नसल्यामुळे दर्जा राखला जात नाही. कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. कामात सुचवलेल्या बदलांची अंमलबजावणी होत नाही.
- सुनील ढोले, सरपंच, वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर- कोऱ्हाळे खुर्द रस्ता
अंतर- ५ किलोमीटर
खड्ड्यांची संख्या - २५० ते ३००
गेल्या पाच वर्षातील निधी - ३ कोटी ३० लाख
02857
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.