डॉक्टरसह सहकाऱ्याला ठोकल्या बेड्या

डॉक्टरसह सहकाऱ्याला ठोकल्या बेड्या
Published on

वडगाव निंबाळकर, ता. ६: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडिताचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. योगेश हनुमंत नरूटे आणि त्याला मदत करणाऱ्या पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना अनुक्रमे तीन आणि दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणातील मुख्य आरोपीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. तपासात असे समोर आले की, मृत आरोपीने पीडिताचा गर्भपात डॉ. योगेश नरूटे (रा. जाधववाडी, ता. फलटण) याच्या मदतीने केला होता. या गुन्ह्यात त्याला सहकार्य केल्याबद्दल शरद धुमाळ (रा. कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. वडगाव निंबाळकर पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, यामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com