Tue, March 28, 2023

इंदापुरात आंब्याच्या झाडांना मोहोर
इंदापुरात आंब्याच्या झाडांना मोहोर
Published on : 30 January 2023, 8:32 am
इंदापुरात आंब्याच्या झाडांना मोहोर
वडापुरी, ता. ३० :पोषक हवामानामुळे इंदापूर तालुक्यात जानेवारी महिन्यातच आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर लागला आहे. सध्या इंदापूर -अकलूज या रस्त्यावरून ये-जा करताना मोहोर लागलेली आंब्याची झाडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मावळतीच्या सूर्यप्रकाशात आंब्याचा मोहोर सोनेरी दिसत असल्याने झाडाचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून शेतकऱ्यांनी बांधावरती कृषी विद्यापीठातून आंब्याची रोपे आणून लागवड केली आहे. इंदापूर तालुक्यात आंबाच्या बागांचे क्षेत्र अत्यल्प असले तरी बहुतांशी शेतक-यांचे बांधावरती मात्र आंब्यांची दोन-चार झाडे हमखास लावले असल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, मोहर चांगला टिकल्यास यावर्षी आंब्याचा सिझन चांगला जाईल, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
01721