Sun, May 28, 2023

वडापुरी येथील भैरवनाथांची यात्रा आजपासून
वडापुरी येथील भैरवनाथांची यात्रा आजपासून
Published on : 28 March 2023, 12:40 pm
वडापुरी ता. २८ : वडापुरी (ता. इंदापूर) येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यांच्या यात्रेला बुधवारपासून सुरुवात होत असून, बुधवार व गुरुवार या दोन दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे.
यात्रेनिमित्त श्री भैरवनाथ मंदिर व श्रीनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी श्रींचा अभिषेक, सायंकाळी पाच वाजता श्रीनाथ मंदिरातून पालखीचे प्रस्थान, नंतर मानाच्या आरती, तर रात्री श्रींची भव्य (छबिना) मिरवणूक निघणार आहे. गुरुवारी भव्य अशा जंगी कुस्त्यांचे मैदान होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.
---------------------