
वडापुरीत वादळी वाऱ्यामुळे केळीला फटका
वडापुरी, ता. ५ : वडापुरी (ता. इंदापूर) येथील शेतकरी वासुदेव नारायण थोरात यांच्या शेतातील अर्धा ते पाऊण एकरातील ७५० ते ८०० केळीची झाडे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाले असून साधारणता पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी वासुदेव थोरात यांनी सांगितले.
थोरात यांनी आपल्या शेतात एक एकर केळीची बाग केली होती. या बागेत साधारणतः १२०० झाडे होती. मात्र आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळजवळ ७५० ते ८०० झाडे भुईसपाट झाली. यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याची खंत थोरात यांनी व्यक्त केली.
जवळजवळ एक केळीचा घड ४० किलोचा होता तो १२ रुपये किंवा १३ रुपये किलोने जाणार होता. ३० टन केळीचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वासुदेव थोरात यांनी सांगितले. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी थोरात यांनी व्यक्त केले.
01849