शेतकरी कुटुंबातील मुलगी बनली पोलिस उपनिरीक्षक

शेतकरी कुटुंबातील मुलगी बनली पोलिस उपनिरीक्षक

Published on

वडापुरी, ता. ८ : काटी (ता.इंदापूर) या छोट्याशा गावातील व शेतकरी कुटुंबातील असलेल्या ज्योती नारायण शिंदे या मुलीने जिद्द व चिकाटीच्या जोरावरती पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे.
ज्योती शिंदे हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण काटी गावातच झाले. त्यानंतर बारावीचे शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे झाले. बारावीनंतर डिप्लोमा केला व चांगल्या मार्क्समुळे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड प्रवेश घेतला व नंतर जिद्दीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

ज्योतीने सांगितले की, २०२० ची परीक्षा पास झाली असून, तो माझा पहिलाच प्रयत्न होता. यासाठी असलेला अभ्यास मी घरी राहूनच केला होता. या यशात माझी आई संगीता शिंदे वडील नारायण शिंदे, मावसभाऊ गणेश गोविंद शेंडे, मामा महादेव भोंग व सतेश भोंग यांची मदत मिळाली.
माझ्या घरची परिस्थिती बेताची व हालाखीची असल्याने माझ्या आई-वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन आम्हा भावंडाचे शिक्षण पूर्ण केले आहे, त्यामुळे मला घरी राहून अभ्यास करावा लागला. ऑनलाइन कोर्स घ्यायचा असेल, तरी पण पैसे नसायचे. परीक्षेच्या तयारीसाठी गणेश शेंडे या मावस भावाने खूप मदत केली असल्याचे ज्योती शिंदे यांनी सांगितले.

काटी गावातील बरेच विद्यार्थी अधिकारी बनले आहेत, त्या अधिकाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी एक अधिकारी बनेल अशी जिद्द व चिकाटी डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यास करत राहिली आणि या जिद्द व चिकाटीच्या जोरावरत २०२० रोजी दिलेल्या परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास झाली व करून पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पद मिळविले.
- ज्योती शिंदे


01907

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.