शेतकऱ्यांची शाश्‍वत उत्पन्नाच्या खात्रीमुळे पेरूला पसंती

शेतकऱ्यांची शाश्‍वत उत्पन्नाच्या खात्रीमुळे पेरूला पसंती

वडापुरी, ता. ८ : इंदापूर तालुक्यातील शेतकरी खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने पेरू फळ बागेकडे वळाला आहे. शाश्‍वत उत्पादन व हमखास उत्पन्नाची खात्री असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरू लागवडीची गोडी लागली आहे. यामुळे तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पेरूच्या बागा बहरू लागल्या आहेत. तालुक्यातील १४० गावांपैकी ९१ गावांमध्ये पेरुची लागवड केली जात आहे.

पेरू या फळपिकास देश तसेच परदेशी बाजारपेठेत अधिक मागणी आहे. कोणत्याही जमिनीत व हवामानात येणारे पीक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. कारण पूर्वी इंदापूर तालुक्यातील शेतकरी द्राक्ष व डाळिंब या बागाकडेच वळाला होता. मात्र सतत बदलत असलेल्या वातावरण बदलामुळे बागा जैविक व अजैविक ताणास बळी पडत आहे. जागतिक मंदीमुळे सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी बागेकडे वळाला असून, तैवान, पिंक, व्हीएनआर व गुजरात रेड या वाणांची पेरूची लागवड केली असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील एकूण पेरू क्षेत्रापैकी ७० टक्के पिंक तैवान, २० टक्के व्ही एन आर व १० टक्के गुजरात रेड जातीची लागवड दिसून येत आहे. तालुक्यातील समशीतोष्ण हवामानामुळे उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगाम धरता येतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या पेरूच्या फळभाज्याकडे वळाला आहे. फळबागेकडे वळाला आहे.
पेरू फळामध्ये असणारे क जीवनसत्त्व हे संत्रा व मोसंबी पेक्षा पाचपट अधिक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे पेरू खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. भविष्यामध्ये आपल्या भागातील शेतकरी शास्त्रीय ज्ञानाचा अचूक वापर करून उच्च प्रतीचे पेरू उत्पादन घेतील.
- राजेंद्र वाघमोडे, संचालक, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र

खरीप व रब्बी हंगामापेक्षा फळबागा परवडत आहेत, कारण रब्बी व खरीप हंगामातील पिकांसाठी लागणारे बी बियाणे, खते, कामासाठी लागणारे मजूर(कामगार) पाणी याचा खर्च काढला तर उत्पन्नापेक्षा खर्च जादा होत आहे. त्यामुळे शाश्वत फळपीक म्हणून शेतकऱ्यांची पेरूला पसंती दरही चांगला मिळत आहे.
- श्रीकांत पवार, पेरू उत्पादक शेतकरी

सध्या गोतोंडीमध्ये सर्वाधिक (२४३) हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड करण्यात येत आहे. वरकुटे खुर्द (२०० हेक्टर), पिटकेश्वर (१९९ हेक्टर) शेळगाव (१९०हेक्टर) निमगाव केतकी (१२० हेक्टर) ही पेरूची सर्वाधिक लागवड करणारी महत्त्वाची गावे आहे. अवसरी येथे पूर्वी ४० हेक्टरवर लागवड होत होती. ती क्षेत्र ४५ हेक्टरने वाढून ८५ हेक्टर झाले आहे.
- भाऊसाहेब रूपनवर, इंदापूर तालुका कृषी अधिकारी

वर्षनिहाय वाढलेले पेरू फळबागेचे क्षेत्र हेक्टरमध्ये :
२०१९- २०.....३५६
२०२०- २१.....४७७
२०२१- २२.....८९६
२०२२- २३.....१०४७
२०२३-२४.....२४४९.५

02116

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com