पुणे
इंदापुरातील पावसाचा खरिपातील पिकांना फायदा
वडापुरी, ता. १५ : इंदापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
तालुक्यात गेल्या आठ दिवसापर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्याची वेळ आली होती. गेल्या आठ दिवसांपासून कडक ऊन पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे ओढे, नाले, तलाव पाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही.
तालुक्यातील काटी वडापुरी, रेडा, रेडणी, अवसरी, बेडशिंग, शेटफळ हवेली, पंधरवाडी, विठ्ठलवाडी येथील शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले असल्याचे चित्र आहे.