
सोंडे सरपाले शाळेचे शिष्यवृत्तीत यश
वेल्हे, ता. ३० : शिष्यवृत्ती परीक्षेत वेल्हे तालुक्यातून पाचवीच्या ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५२.०९ टक्के निकालासह वेल्हे तालुक्याचा शिरूर पाठोपाठ जिल्ह्यात दुसरा क्रमांक लागतो. तर आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेल्हे तालुक्याचा निकाल धक्कादायक असून केवळ २.८२ टक्के इतका लागला आहे. आठवीसाठी १२ माध्यमिक शाळेतून २२२ पैकी २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सोंडे सरपाले शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदा या शाळेच्या ४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या शाळांपैकी सर्वाधिक विद्यार्थी सोंडे सरपाले या शाळेच्या आहेत. आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून ६ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले पाचवीचे विद्यार्थी -
श्लोक प्रवीण पोमण, रुद्र शंकर केळतकर, आदिती प्रकाश जाधव, अस्मिता रघुनाथ रेणुसे, हर्षल प्रकाश दामगुडे, हर्षद संतोष भिलारे, अभय तुकाराम जाधव, तन्वी बाळू शिंदे, तनिष्का गोविंद रसाळ, अभय संतोष खुटवड, तुकाराम धनाजी चव्हाण, रिया राहुल सरपाले, अनिकेत प्रकाश शिर्के, प्रतीक्षा सचिन दामगुडे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले आठवीचे विद्यार्थी - निशा नितीन सोनवणे, कुणाल एकनाथ देवगिरीकर, समृद्धी संपत आधवडे, अलिशा जानबा रणखांबे.
या यशाबद्दल माजी सभापती दिनकर सरपाले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, तहसीलदार शिवाजीराव शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) कमलाकांत म्हेत्रे, वेल्ह्याचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, गटशिक्षणाधिकारी पोपट नलावडे आदींनी अभिनंदन केले.