वेल्ह्यातील खून दागिन्यांसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्ह्यातील खून दागिन्यांसाठी
वेल्ह्यातील खून दागिन्यांसाठी

वेल्ह्यातील खून दागिन्यांसाठी

sakal_logo
By

वेल्हे, ता. ३० : वेल्हे तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी एका व्यक्तीचा लोखंडी रॉड, वीट आणि लोखंडी वस्तू डोक्यात मारून खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह घर बांधत असलेल्या खड्ड्यात टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी पुरला होता. सदरची घटना बुधवार (ता. १८) उघडकीस आली. सोन्या-चांदीच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
वेल्हे पोलिसांनी या घटनेचा समांतर तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयाचे वे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे, विजय दत्तात्रेय निवंगुणे, ओंकार नितीन निवंगुणे आणि पांडुरंग रामभाऊ निवंगुणे, अशा चार जणांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, खून झालेला विजय याने घरातून निघताना सोबत सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन गेल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. त्यानुसार वेल्हे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी नितीन निवंगुणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
विजय हा घरी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन आला होता, ही माहिती आरोपींना समजली. त्यांनी संतोषनगर-कात्रज येथे स्टीलच्या चिमट्याने विजय याच्या डोक्यात तोंडावर मारून त्यास जबर जखमी करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकून इनोव्हा मोटारीने रानवडी (ता. वेल्हे) येथे मालकीच्या शेतजमिनीत विजय निवंगुणे याच्या सह्याने खड्ड्यात पुरला, अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. सोने-चांदी आणि मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे.