वेल्ह्यात महाराजस्व अभियानाचा ५०२९ जणांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्ह्यात महाराजस्व अभियानाचा ५०२९ जणांना लाभ
वेल्ह्यात महाराजस्व अभियानाचा ५०२९ जणांना लाभ

वेल्ह्यात महाराजस्व अभियानाचा ५०२९ जणांना लाभ

sakal_logo
By

वेल्हे, ता. ९ : वेल्हे तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित महाशिबिरामध्ये ५०२९ जणांना लाभ मिळाल्याची माहिती नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांनी दिली.
मेंगाई मंदिराच्या प्रांगणात महाराजस्व अभियानाचे महाशिबिर मंगळवारी (ता.७) पार पडले. शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्रे, दाखले नागरिकांना सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावेत म्हणून तालुक्यांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला आहे. महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांश वेळा विलंब होतो. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीताही विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी प्रवेशापूर्वी दूर व्हाव्या, शिधा पत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरिकांना सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने या महा शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, परिविक्षाधिन तहसीलदार डॉ.प्रियंका मिसाळ, नायब तहसीलदार मयूर बनसोडे, महसूल अव्वल कारकून तीर्थगिरी गोसावी, पुरवठा इन्स्पेक्टर उत्तम आगलावे, नवनाथ अनारसे, सुधीर जायभाय, गोपाळ गोडवे, महेंद्र भोई, सरिता कांबळे, सहायक गटविकास अधिकारी उत्तम साखरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, सरपंच संदीप नगीने, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव वालगुडे, विस्तार अधिकारी पोपट नलावडे, महावितरण चे उपअभियंता संतोष शिंदे, विठ्ठल भरेकर, सूर्यकांत शिंदे, आदींसह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

मिळालेला लाभार्थ्यांची संख्या
जणांना लाभ देण्यात आले
शिधापत्रके संदर्भात कामे....९७१
संगणिकृत सातबारा व फेरफार....८४५
आधार कार्ड.....४९८
उत्पन्नाचे प्रमाणपत्र.... १२६
जातीचे प्रमाणपत्र..... ९५
रहिवासी प्रमाणपत्र.... ६४
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.... ७७
डोमिसाईल प्रमाणपत्र....३२
मतदार यादी मध्ये नवीन मतदार नोंदणी.... ५२
मोफत आरोग्य तपासणी.... १०६१
आयुष्यमान भारत कार्ड योजना .....१५८
कृषी विषयक विविध योजनांची माहिती.....३६१
जनावरांची मोफत तपासणी....५९८
जमीन मोजणी संदर्भात फी भरून घेणे.... ३८
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना.....१८

01628