तोरणा, राजगड परिसरात शिवरायांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोरणा, राजगड परिसरात शिवरायांचा जयघोष
तोरणा, राजगड परिसरात शिवरायांचा जयघोष

तोरणा, राजगड परिसरात शिवरायांचा जयघोष

sakal_logo
By

वेल्हे, ता. २२ ः किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी व किल्ले राजगडच्या परिसरात पारंपरिक मिरवणुका, ढोल ताशांचा गजर, पोवाडे, शिव व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात पार पडली.
वेल्हे तालुक्यातील तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात एस. के. कॉन्ट्रॅक्ट अभियंता प्रतिष्ठानमार्फत शिवजयंतीनिमित्त गरजू ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. मेंगाई तरुण मंडळ वेल्हे या मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी राजगडवरुन शिवज्योत आणली. शिव पाळणा, शिव भजन, शिव प्रतिमा पूजन तसेच मिरवणूक काढण्यात आली. पंचायत समिती आवारातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपतींचा जयघोष करण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
किल्ले राजगड पायथा पाल बुद्रुक येथे शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. वांगणीवाडी, कोळवडी, सोंडे हिरोजी, करंजावणे, धानेप, दापोडे, रूळ येथे उत्साहात मिरवणूक, पोवाडे अशा अनेक विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. अंबवणे येथे मिरवणुकी नंतर सामूहिक छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.