वेल्हे, विंझर येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पेन देऊन स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्हे, विंझर येथे विद्यार्थ्यांचे 
गुलाबपुष्प, पेन देऊन स्वागत
वेल्हे, विंझर येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पेन देऊन स्वागत

वेल्हे, विंझर येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पेन देऊन स्वागत

sakal_logo
By

वेल्हे, ता. २ : वेल्हे तालुक्यातील वेल्हे येथील तोरणा विद्यालय व विंझर येथील न्यू इंग्लिश स्कूल विंझर येथे दहावीच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प, पेन देऊन करण्यात आले; तर
अंबवणे परिक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी केली. तालुक्यातून तीन परीक्षा केंद्रामधून ६८६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट नलावडे यांनी दिली.
अंबवणे येथील परीक्षा केंद्रावर ३४६ पैकी ३४५ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल विंझर येथून १८० विद्यार्थी; तर तोरणा विद्यालय वेल्हे येथून विद्यार्थी १६१ परिक्षेस बसले आहेत. तोरणा विद्यालय वेल्हे विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गोरक्ष भुरूक, गणेश निकम, राजाभाऊ लायगुडे, नितीन पुरोहित उपस्थित होते. वेल्हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी तीनही केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे,तर महसुल विभागाकडून भरारी पथक नेमले आहेत. गटशिक्षणाधिकारी पोपट नलावडे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.