वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडण्याची शक्यता

वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडण्याची शक्यता

Published on

वेल्हे, ता.१८ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यानंतर काही दिवसानंतरही वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत दिसले होते. मात्र, आज झालेल्या बैठकीमध्ये कोअर कमिटीच्या माध्यमातून येत्या शुक्रवारी वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेसमोर येणार असली तरीही पक्षामध्ये उभी फूट पडणार असल्याचे चित्र आजच्या बैठकी नुसार समोर येत आहे.

वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्हे येथील जनसंपर्क कार्यालयात आज मंगळवार (ता. १८) रोजी पक्षाची सद्यस्थितीच्या राजकारणावर कोणाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील महत्त्वाची पदे असलेल्या सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी सर्वात अगोदर भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच कात्रज दूध संघाचे नवनियुक्त अध्यक्ष भगवानराव पासलकर, माजी सभापती व पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, माजी युवक अध्यक्ष विकास नलावडे युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत, तालुका युवकचे कार्याध्यक्ष संदीप खुटवड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. तर वेल्हे तालुक्यामध्ये रेवणनाथ दारवटकर यांना मानणारा मोठा वर्ग असून, दारवटकर यांचा मोठा गट व विश्वासू सहकारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणातील प्रशासनावर असलेली वचक व विकासाच्याबाबत घेतल्या जाणाऱ्या भूमिका व निर्णयानुसार त्यांच्याकडे आकर्षिला गेला असून यामध्ये प्रामुख्याने माजी पंचायत समिती सदस्य गुलाब रसाळ , मेंगाई देवस्थान ट्रस्टचे सचिव विलास पांगारे, लव्ही गावचे सरपंच शंकर रेणुसे, कोदापूर गावचे माजी सरपंच भिमाजी देवगिरीकर, चिरमोडी गावचे माजी सरपंच किसन रसाळ, दत्ता पानसरे, बंडा दामगुडे, सचिन शिळीमकर, रामदास गायकवाड, तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजू अप्पा रेणुसे, अण्णा शिंदे, किसन तोडकर, नारायण जागडे, अंकुश पासलकर, विजय रानवडे, नंदू गोरड अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे .


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना वेल्हे तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तानाजी मांगडे, केळदचे माजी सरपंच व तालुका कार्याध्यक्ष रमेश शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कारले, एकनाथ वालगुडे यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक यांनी राजकारणाच्या पलीकडे पवार कुटुंबाशी नाते असल्याचे सांगून कोणत्या एका गटाच्या बाजूने पाठिंबा देण्याचे टाळले. दरम्यान, तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे तसेच महिला अध्यक्षा कीर्ती देशमुख हे अद्यापही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहेत.

येत्या शुक्रवारी होणार निर्णय जाहीर
शुक्रवारी २१ जुलै रोजी तालुक्यातील पक्षातील दहा जणांची कोर कमिटी निर्णय जाहीर करणार असले तरीही आज झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही गटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे पक्षात उभी फूट पडणार असल्याचे चित्र समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.