बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा

बँकेच्या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा

वेल्हे, ता.३१ : ''वेल्हे तालुक्यात पर्यटनासाठी हजारो पर्यटक येत आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, तरुणांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधून आत्मनिर्भर व्हावे.'', असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी केले.

वेल्ह्यातील जिल्हा बँकेच्या बैठक हॉलमध्ये शुक्रवारी (ता.२८) व्याज परतावा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दारवटकर बोलत होते. ते म्हणाले की, वेल्हे तालुक्यांमध्ये दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री याबरोबरही कृषी पर्यटन सारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा.

रब्बी व खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जावरील राज्य सरकारकडून आलेल्या तीन टक्के व्याज परताव्याची रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.
बँकेचे शेती कर्ज विभागाचे उपसरव्यवस्थापक सी. एस. इंगळे म्हणाले, ''जिल्हा बँकेकडून नाबार्डच्या सूचनेनुसार सभासद शेतकऱ्यांना व्याजाचे रक्कम शासन डीबीटीद्वारे दिली जाते यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेती कर्ज वरील तीन टक्के व्याज हे राज्य शासनाच्या माध्यमातून तर तीन टक्के व्याज केंद्र सरकारच्या माध्यमातून भरले जाते त्यामध्ये राज्य सरकारकडून तीन टक्के व्याजाची रक्कम आली आहे.

यावेळी पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, वेल्हे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, राष्ट्रवादीचे माजी युवक तालुका अध्यक्ष विकास नलावडे, किरण राऊत, शंकर रेणुसे, गुलाबराव रसाळ, भिमाजी देवगिरीकर, राजू रेणुसे, सुनील राऊत, बापू जाधव, रामदास गायकवाड, हनुमंत कुढले, तानाजी खुटवड, नथू वालगुडे आदींसह तालुक्यातील सोसायटीचे अध्यक्ष तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील एकूण सात जिल्हा बँकेच्या शाखेमधून २६२७ शेतकऱ्यांचा व्याजाचा परतावा तेहतीस लाख दहा हजार एवढी रक्कम सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अद्यापही केंद्र सरकारकडून तीन टक्के व्याजाची रक्कम येणे बाकी आहे.
- पी.डी. गायकवाड, विभागीय अधिकारी, वेल्हे


01949

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com