पानशेत येथे सराईताकडून
पोलिस जवानाला मारहाण

पानशेत येथे सराईताकडून पोलिस जवानाला मारहाण

वेल्हे, ता. ३१ : पानशेत (ता. वेल्हे) येथील बाजारपेठेत मद्यपान करून वेल्हे पोलिस ठाण्याचे कर्मचारी कांतिलाल कोळपे यांना मारहाण करणाऱ्या हनुमंत ऊर्फ गोट्या दत्तात्रेय शेजवळ (वय ३३, रा. रुळे, ता. वेल्हे) यास वेल्हे पोलिसांनी अटक केली.
सराईत गुन्हेगार गोट्या शेजवळ हा रविवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत पानशेत बाजारपेठेत शिवीगाळ करून धिंगाणा घालत आहे, अशी माहिती स्थानिक व्यावसायिकांनी वेल्हे पोलिसांनी दिली. रविवारच्या सुटीमुळे मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावर बंदोबस्तात असलेले पोलिस जवान कोळपे यांनी सोबतच्या पोलिस जवानांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गोट्या हा बापू मळेकर यांच्या चायनीज सेंटरसमोर धिंगाणा घालत होता. त्यावेळी कोळपे यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत कोळपे यांच्या पायाला दुखापत झाली. गोट्या शेजवळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने मद्यपान केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com