फिरत्या दवाखान्यामुळे दुर्गम भागात मिळणार आरोग्य सुविधा

फिरत्या दवाखान्यामुळे दुर्गम भागात मिळणार आरोग्य सुविधा

Published on

वेल्हे, ता. २ : राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या वतीने भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) कॉलेज ऑफ आयुर्वेद आणि हॉस्पिटलला संपूर्ण सुसज्ज वैद्यकीय दवाखाना ‘ऑन व्हील’ची व्हॅन (फिरता दवाखाना) भेट देण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी कोटक महिंद्रा बँकेने (कोटक कर्मा) CSR निधी उपलब्ध केला आहे. श्रीमती विजयमाला पतंगराव कदम यांच्या हस्ते २५ जून रोजी क्लबचे अध्यक्ष आरटीएन गिरीश ब्रह्मे यांच्या हस्ते, वैद्यकीय संचालक शुभांगी काटकर, उपवैद्यकीय संचालक डॉ. उमेश वैद्य आणि डॉक्टर आणि क्लब सदस्यांच्या उपस्थितीत ही व्हॅन रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली तर सोमवारी (ता.१) डॉक्टर दिनानिमित्त हा फिरता दवाखाना वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला.
दरम्यान, व्हॅनच्या उद्‌घाटनप्रसंगी व्हॅनमध्ये रुग्ण आणि ग्रामस्थांना स्वच्छता, साक्षरता यावरील वैद्यकीय शैक्षणिक चित्रपट तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड आणि भारती हॉस्पिटल यांच्या विविध शिबिरांची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली आहे.
डॉक्टर दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे पहिले वैद्यकीय शिबिर पार पडले. त्याचे उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष आरटीएन पराग गाडगीळ, सचिव आरटीएन देवदत्त हंबर्डीकर, वैद्यकीय संचालक आरटीएन संजीव करंजकर, सरपंच मेघराज सोनवणे, माजी सरपंच संतोष मोरे, गोरक्ष भुरुक, सुनील राजीवडे, विनोद गायकवाड, डॉ. प्रियंका कुंभार, आशा कदम आदी उपस्थित होते.


वातानुकूलीत व्हॅनमध्ये असलेल्या सुविधा
* ECG मशिन, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AED)
* ऑक्सिजन सिलिंडर, सक्शन तसेच बिपॅप मशिन
* इमर्जन्सी बॅग, औषधे आणि लसींसाठी फ्रीज
* डोळ्यांच्या तपासणीसाठी एलईडी व्हिजन ड्रम


आठवड्यातून ५ दिवस दुर्गम असणार भागात सुविधा
वैद्यकीय व्हॅन भारती हॉस्पिटलद्वारे आठवड्यातून किमान ५ दिवस ग्रामीण अंतर्गत गावे आणि वेल्हेच्या दुर्गम भागात जिथे सध्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी चालवली जाणार आहे. या सेवा अत्यंत अनुदानित असतील आणि लाभार्थ्यांना कमीत कमी शुल्कात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दवाखाना तीन वर्षासाठी कार्यरत ठेवण्याची जबाबदारी भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) आयुर्वेदिक कॉलेज व रुग्णालयाने घेतली आहे. यासाठी आवश्यक अर्थ सहाय्य रोटरी क्लबतर्फे देण्यात येणार आहे.

02487

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.