रांजणे येथे बेकायदा दगड वाहतूक; डंपरमालकास अडीच लाखांचा दंड
वेल्हे, ता. ९ : राजगड तालुक्यातील खानापूर-पाबे घाट रस्त्यावर रांजणे येथे बेकायदा दगड (डबर) वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत डंपर मालकावर अडीच लाख रुपयाचा दंड आकारला असल्याची माहिती राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
पानशेत परिसरामध्ये अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून परवानगी न घेता बेकायदा उत्खनन केले जात असून रांजणे रस्त्यावर बेकायदा दगड वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल पथकास मिळताच डंपर (क्र. एमएच ०४ एल क्यू ५१४७) नुकताच ताब्यात घेतला आहे. या वाहनाविरुद्ध फौजदारी व दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे. राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे म्हणाले की,
राजगड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते, प्लॉटिंग व फार्म हाउससाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा डोंगर टेकड्या फोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी होऊन जैवविविधता धोक्यात येत असून अनेक वेळा या उत्खननामुळे परिसरातील शेतीचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले असून कोणीही बेकायदा करू नये. अनधिकृत उत्खनन व वाहतूक केल्यास धडक फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
3347
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

