तालुकास्तरीय स्पर्धेत पानशेतचा डंका
वेल्हे, ता. १६ : वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील तोरणा विद्यालयात यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद समूह शाळा पानशेतने सर्वाधिक बक्षीसे मिळवून पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
राजगड पंचायत समितीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन राजगडचे गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील यांनी केले. क्रीडा स्पर्धांमध्ये ५० मीटर, १०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, वक्तृत्व स्पर्धा बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, लंगडी, लेझीम, लोकनृत्य स्पर्धा, मल्लखांब, पोवाडा, कविता गायन अशा स्पर्धांचा समावेश होता. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे यांनी भोजन, पदक, ट्रॉफी आणि पारितोषिकांची व्यवस्था केली होती. पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभ गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर शेवते, शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटसमन्वय शकील मुल्ला, शिक्षण विस्तार अधिकारी राजश्री गावडे, देवराम गायकवाड, केंद्रप्रमुख बाळासाहेब शेख, सुजाता काशीद आदी उपस्थित होते.

